माती नमूना कसा काढावा.

माती परीक्षण.

जमिनीची उत्पादकता ही 16 अन्न घटकावर अवलंबून आहे. त्यामध्ये मुख्य घटक– नत्र, स्फुरद, पालाश, हायड्रोजन, ऑक्सिजन व कार्बन. दुय्यम अन्नघटक-कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक. सूक्ष्म अन्नघटक– मंगल, तांबे , जस्त, बोरॉन, क्लोरीन, मॉलिबेडम. जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि रासायनिक खताचा संतुलित वापर करण्यासाठी तसेच जमिनीची सुपीकता आजमवण्यासाठी, जमिनीतील अन्नघटक समजून घेण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. माती परीक्षण जनजागृती करण्यासाठी पाच डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो

माती परीक्षणाचे महत्त्व.

-जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते

– शिफारशीनुसार योग्य प्रमाणात खताची मात्रा देता येते -त्यामुळे खताची बचत होऊन अन्नद्रव्यांचा समतोल टिकून राहतो

-जमिनीची सुपीकता वाढते जमीन आम्लयुक्त किंवा क्षारयुक्त असल्यास सुधारण्यासाठी उपयोजना करता येतात

– पीक उत्पादन वाढते आर्थिक बचत होते

– पिकांमधील अन्नद्रव्य कमतरता कळल्याने उपाययोजना करणे सोपे होते.

माती नमुण्यासाठी लागणारे साहित्य.

घमेले, फावडे, खुरपे, कुदळ, कापडी पिशवी,

माती परीक्षण, माती नमूना कसा काढावा, माती तपासणीचे फायदे, सुक्ष्म अन्नद्रव्य

माती नमुना कसा घ्यावा.

-माती नमुना काळजीपूर्वक काढावा.

-प्रथम शेतात गेल्यानंतर शेताची पाहणी करावी, जमिनीच्या प्रकारानुसार, रंगानुसार, मातीच्या प्रकारानुसार व पीक पद्धतीनुसार जमिनीची विभागणी करावी.

-प्रत्येक विभागातून स्वतंत्ररित्या वेगळा नमुना घ्यावा.

– नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारे अवजारे स्वच्छ असावेत.

– नमुना घेण्यासाठी शेतामध्ये झिकझ्याक आकारात 7-8 ठिकाणी जागा निश्चित कराव्यात.

-निश्चित केलेल्या जागेवर इंग्रजी v आकाराचा खड्डा करावा व खड्ड्यातील वरची माती काढून आतील माती नमुन्यासाठी घ्यावी.

-सर्व ठिकाणची माती एकत्र करावी व त्याचे चार समान भाग करून दोन भाग नमुन्यासाठी घेऊन उर्वरित दोन भाग टाकून देण्यात यावे. घेतलेल्या दोन भागाचे परत चार भाग करून त्यापैकी दोन भाग घेऊन उर्वरित टाकून द्यावे. उर्वरित अशी कृती अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत करावी.

– जर माती ओली असेल तर ती सावलीत सुखवावी.

माती नमुना घेताना घ्यावयाची काळजी.

माती नमुना घेण्यासाठी जागा ही बांधावरची, जनावर बसण्याची, झाडाखालची, कचरा टाकण्याची, खते साठवण्याची, विहिरी जवळची निवडू नये. माती नमुन्यासाठी वापरण्यात येणारे अवजारे स्वच्छ असावेत. माती नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी वापरण्यात येणारी पिशवी ही रासायनिक खताची वापरू नये. माती नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी काढावा. उभ्या पिकाचा माती नमुना घ्यायचा असेल तर दोन ओळी मधील माती नमुना घ्यावा. रासायनिक खत दिले असल्यास दोन ते तीन महिने माती नमुना काढू नये.

माती नमुना प्रयोग शाळेत पाठविताना सोबत काय माहिती पाठवावी.

शेतकऱ्याची पूर्ण नाव

पूर्ण पत्ता

मोबाईल नंबर

आधार नंबर

सर्वे नंबर

जमिनीचा प्रकार बागायत- जिरायत

ओलिताचे साधन

नमुना घेतल्याची तारीख

जमिनीचा उतार व खोली

मागील हंगामात घेतलेले पिक त्याचे आलेले उत्पन्न

वापरलेले खते पुढील हंगामात घ्यायची पिक त्याची जात व अपेक्षित उत्पन्न

अधिक माहिती वाचा.

6 thoughts on “माती नमूना कसा काढावा.”

Leave a comment