एक रुपयात पिक विमा.

जाणून घ्या साध्या सोप्या भाषेत.

खरीप हंगाम 2023-24 मध्ये राज्य शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेत मागील वर्षी खरीप पिकांसाठी 2% व रब्बी पिकांसाठी 1.5% विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागत असे पण आता चालू खरीप हंगामापासून शेतकऱ्यांचा हप्ता राज्य शासन भरणार असल्याने शेतकऱ्यांना फक्त एक रुपया टोकन रक्कम भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा हिस्सा राज्य शासनामार्फत विमा कंपनीकडे भरण्यात येईल.

पिकविमा योजनेत भाग कोण घेऊ शकतो.

 • सर्व शेतकरी, – कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह.
 • भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यास भाडेपत्र विमा कंपनीस सादर करणे बंधनकारक आहे.
 • पिककर्ज घेणारे व न घेणारे शेतकरी.
 • पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सदरील योजना बंधनकारक नाही.

पिकविमा योजनेतील समाविष्ट पिके अणि संरक्षित रक्कम.

सोयाबीन, कारळे, कापूस, भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, कांदा, भुईमूग, तीळ, उडीद, मक्का,

पिक विमा संरक्षित रक्कम
सोयाबीन ३१२५० – ५७२६७ रु
कापूस २३००० – ५९९८३ रु
कांदा ४६००० – ८१४२२ रु
भात ४०००० – ५१७६० रु
ज्वारी २०००० – ३२५०० रु
बाजारी १८००० – ३३९१३ रु
नाचणी १३७५० – २०००० रु
मक्का ६००० – ३५५९८ रु
तूर २५००० – ३६८०२ रु
मूग २०००० – २५८१७ रु
उडीद २००००-२६०२५ रु
भुईमूग २९००० – ४२९७१ रु
तिळ २२००० – २५००० रु
कारळे १३७५०

पिकविमा संरक्षण कधी मिळेल.

 • विमा संरक्षण हे उंबरठा उत्पादनावर ठरवले जाईल.
 • उंबरठा उत्पादन हे मागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाची पाच वर्षाची सरासरी गुणवले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते.
 • पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट.
 • अपुरा पाऊस किंवा प्रतिकूल घटकांमुळे अधिसूचित क्षेत्रातील मुख्य पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी होऊ शकली नाही तर विमा संरक्षण लागू राहील.
 • हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे जसे पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या 50% पेक्षा अधिक घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील.
 • काढणी पश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस, गारपीट यामुळे कापणीनंतर शेतात ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते.
 • स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन किंवा गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास बाधित पिकांचे वैयक्तिक पंचनामे करून नुकसान भरपाई देय राहील.

नुकसान भरपाई मिळवण्यासाठी हे करा.

 • नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत विमा कंपनीस, कृषी अथवा महसूल विभागास अथवा केंद्र शासनाचा पीक विमा ॲपवर ऑनलाईन तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.
 • नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्याने ई पीक पाहणी या ॲपवर पिक पेरा लावणे आवश्यक आहे.

पिक विमा भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे व अंतिम दिनांक

 • सातबाराचा उतारा
 • बँक पासबुक
 • आधार कार्ड
 • पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र


अंतिम दिनांक:- 31 जुलै 2023

विमा हप्ता:- एक रुपया प्रति अर्ज

पीकविमा कोठे भरावा.

-सर्व कागदपत्रे घेऊन प्राधिकृत बँकेत शेतकरी विमा हप्त्याची टोकन रक्कम एक रुपया भरून या योजनेत सहभागी होऊ शकतो.
–CSC सेंटरवर आपले सरकारच्या मदतीने तसेच www.pmfby.gov.in या पोर्टलच्या मदतीने विमा भरू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या जिलयातील पिक विमा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर फोन करावा.

नवीन समाविष्ट बाबी

 • शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई मिळणार नाही.
 • शेतातील पीक आणि विमा घेतलेले पिक यात तफावत आढळल्यास ई-पीक पाहणी मधील नोंद अंतिम धरण्यात येईल.
 • यावर्षीपासून भात, कापूस, सोयाबीन पिकामध्ये महसूल मंडळामधील पिकांचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास 30 % भारांकण आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे येणाऱ्या उत्पादनास 70 % भारांकण देऊन मंडळाचे उंबरठा उत्पन्न निश्चित केले जाईल, या अगोदर 100% भारांकण हे पीक कापणी प्रयोगाला होते.

आपल्या जिल्ह्याची पिकविमा कंपनी अणि तिचा टोल फ्री क्रमांक

जिल्हा कंपनी टोल फ्री क्रमांक
बीड, वाशिम, सांगली, नंदुरबार, बुलढाणा. भारतीय कृषि विमा कंपनी1800 419 5004
नगर, नाशिक, सोलापूर, जळगाव, सातारा, चंद्रपूर. ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी ली. 1800 1184 85
परभणी, नागपूर, वर्धा. ICICI लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी ली.1800 266 9725
ठाणे, रत्नागिरी, नांदेड. यूनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी ली.1800 425 33333
पुणे, धाराशिव, अकोला, हिंगोली, धुळे. HDFC अग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी ली.1800 2660 700
जालना, गोंदिया, कोल्हापूर. यूनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी ली. 1800 200 5142
छ.संभाजीनगर, भंडारा. पालघर. रायगड. चोलामंडलंम MS जनरल इन्शुरन्स कंपनी ली. 1800 200 5544
यवतमाळ. अमरावती. गडचिरोली. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी ली.1800 300 24088
लातूर. SBI जनरल इन्शुरन्स कंपनी ली.1800 1232 310
टीप– नैसर्गिक आपत्ति मुळे नुकसान झाल्यावर वरील टोल फ्री क्रमांकावर ७२ तासाच्या आत तक्रार दाखल करावी.

अधिक माहिती वाचा

 1. असे करा गोगलगायीचे नियंत्रण.
 2. महाबीजची दर्जेदार जैविक उत्पादने बाजारात दाखल.
 3. माती परीक्षण कसे करावे.
 4. महाबीज च्या बीज्योत्पादन कार्यक्रमातून मिळवा 30 ते 35 % ते नफा.