About Us

कृषि क्षेत्रात मागील काही वर्षात मोठी प्रगती झाली आहे. त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. तरीही अजून शेतकरी बांधवांचा खूप मोठा वर्ग नवीन तंत्रज्ञानापासून वंचित आहे. बाजारात येणाऱ्या नवनवीन पिकांच्या जाती, नवीन तंत्रज्ञान, तसेच नवीन योजना या शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी “पिक पाणी” समूहाची स्थापना झाली आहे.

या समूहा मध्ये विविध क्षेत्रातील व्यक्ती काम पाहत आहेत, त्यांच्या कामाच्या अनुभवातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्या साठी मोठ्या प्रमानात मदत होणार आहे.

शेतकरी बांधवांची एक प्रमुख अडचण म्हणजे उत्पादित झालेल्या उत्पादनाला योग्य भाव व बाजारपेठ न मिळणे. “पिक पाणी” च्या माध्यमातून लकरच शेतकरी बांधवांच्या उत्पादनाची खरेदी विक्री करण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी बांधव आपले उत्पादन योग्य भावात विकू शकतील तसेच व्यापारी वर्ग हा त्यांना हवे असलेले उत्पादन राज्यभरात कोठे उपलब्ध आहे याची माहिती घेऊ शकतील.

तसेच या समूहा मार्फत कृषि विक्रेत्यांनच्या जाहिरातीसाठी माध्यम उपलब्ध करून देण्यात येईल. ज्यामुळे विक्रेत्यांनाकडे खते, बियाणे व औषधाची उपलब्धता शेतकारी बंधावना कळेल आणि विक्रेत्याना मोफत जाहिरात करता येईल.

धन्यवाद

टीम पिक पाणी