E-KYC करा आणि PM KISAN ची शेतकरी पेनशन मिळवा.

PM KISAN च्या 14 व्या हप्त्यासाठी करा E-KYC. E-KYC प्रक्रिया समजून घ्या सोप्या भाषेत. E-KYC नसल्याने खात्यावर जमा होईनात गरपिट व पावसाच्या नुकसनीचे पैसे.

E-KYC करण्याचे फायदे.

 • राज्य शासन तसेच केंद्र शासन शेतकरी बांधवासाठी DBT अंतर्गत विविध योजना राबावत असते.
 • DBT अंतर्गत योजनेची रक्कम ही थेट शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा होत असते.
 • शासकीय योजनेतील भ्रष्टाचार अणि काळा बाजार बंद व्हावा म्हणून शासना मार्फत DBT ( Direct Benefit Transfer ) थेट लाभ हस्तांतरन मार्फत योजना राबवण्यात येत आहेत.
 • तसेच शासन येथून पुढे सर्व योजना या DBT प्रणालीद्वारेच राबणार आहे. जसे सर्व शेतकारी बंधवाना PM KISAN चे येणारे हप्ते. स्प्रीन्कलर व ठिबक वर मिळणारे अनुदान हे DBT प्रणालीद्वारेच दिले जाते.
 • E-KYC पोर्टल हे पिक विम्या साठी लिंक केले असल्याने या पुढे जर शेतकरी बांधवांची E-KYC पूर्ण नसेल तर शेतकरी बांधवाना पिकविम्याची रक्कम मिळणार नाही.
 • त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर E-KYC करण्याचे आव्हान प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

E-KYC कशी करायची.

E-KYC ची प्रक्रिया ही मोबाइल अॅप वरुण तसेच pm.kisanan वेबसाइट वर जाऊनही करता येते. ही प्रक्रिया यंत्यांत सोपी असून 2 -3 मिनिटात संपूर्ण प्रक्रिया करता येते.

अ) E-KYC वेबसाइट वर करण्याची प्रक्रिया.

 • वेबसाइटवर E-KYC करण्यासाठी प्रथम pmkisan च्या पुढील वेबसाइटवर क्लिक करून वेबसाइट उघडा www.pmkisan.gov.in.
 • उजव्या बाजूला E-KYC वर क्लिक करा.
 • नंतर आधार नंबर टाका.
 • आधार नंबर ला लिंक असणारा मोबाइल नंबर टाका.
 • मोबाइल नंबर वर आलेला OTP टाका.
 • नंतर आधार कार्ड रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल वर आलेला OTP भरणे.
 • सबमिट बटन वर क्लिक करावे.
 • शेवटी “E-KYC has been successfully done” असा मेसेज आल्यावर E-KYC पूर्ण झाल्याचे समजावे.

ब) E-KYC मोबाइल अॅपमध्ये करण्याची प्रक्रिया.

 • PM kisan हे अॅप डाउनलोड करावे. PMKisan चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
 • अॅप डाउनलोड झाल्यावर अॅप मध्ये लॉगइन करा.
 • Login Type मध्ये Beneficiary निवडा
 • नंतर आधार नंबर टाका.
 • आपल्या रजिस्टर मोबाइल नंबरवर आलेला 4 अंकी OTP टाका.
 • आपल्या आधार क्रमांकाचे पहिले 6 अंक टाका.
 • Beneficiary Dashboard वर जाऊन आपली वैयक्तिक माहिती भरून KYC पूर्ण करा.

क) E-KYC करताना घ्यायची काळजी.

 • E-KYC करताना आपला आधार लिंक मोबाइल क्रमांक सोबत असावा.
 • E-KYC करत असताना टाकावा लागणार मोबाइल क्रमांक हा आधार कार्डसही लिंक असावा.
 • E-KYC चा नंबर बँक खात्याशी लिंक असावा.
 • मोबाइल क्रमांक बँकेशी लिंक नसेल तर बँकेशी लवकरात लवकर लिंक करा अथवा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये खाते काढा.

का नाही जमा झाले गरपीटीचे पैसे ?

 • मागच्या वर्षी म्हणजे खरीप 2022 व रब्बी 2022 मध्ये तसेच उन्हाळी पिकां मध्ये गारपिट व अती पावसामुळे राज्यभरातील विविध भागात शेतकरी बंधूच्या शेती मालाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.
 • या नंतर कृषि व महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून सरकारला अहवाल सादर केला होता. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईस 1500 कोटी रु मंजूर केले होते.
 • काही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करत असताना शेतकार्यानी E-KYC केली नसल्याने अडचणी निर्माण झाल्या.
 • त्यानंतर प्रशासनाने वारंवार सूचना देवूनही शेतकरी बांधवानी E-KYC केली नाही त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही.
 • त्यामुळे प्रशासनामार्फत सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर E-KYC करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

अधिक माहिती वाचा

 1. शेतकऱ्यांना उद्योगासाठी मिळणार 10 लाख रु अनुदान. (PMFME scheme)
 2. एक रुपयात पिक विमा.
 3. असे करा गोगलगायीचे नियंत्रण.
 4. महाबीज च्या बीज्योत्पादन कार्यक्रमातून मिळवा 30 ते 35 % ते नफा

Leave a comment