गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. Gopinath Munde Shetkari Apghat vima Yojana. अपघात विमा योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो.  शेतकरी अपघात विमा अर्ज कुठे व कसा करायचा

स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना सुरू केलेले आहे.  या योजनेत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शेतकऱ्याच्या कुटुंबाला 2,00,000 आर्थिक मदत केली जाते त्यासाठी लाभार्थ्याच्या नावावर किंवा कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे यासाठी शासनाने यावर्षी 120 कोटींची तरतूद केलेली आहे. 

अशाच माहितीसाठी आमच्या what’s app ग्रपमध्ये सहभागी होण्यासाठी Join what's app logo क्लिक करा

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो.  

  • ज्याच्या नावावर सातबारा आहे असे सर्व शेतकरी.
  • ज्यांच्या नावावर सातबारावर नाही पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे तर अशा कुटुंबातील कोणताही एक सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • 10 ते 75 वयोगटातील सर्व शेतकरी.

अपघात विमा पासून मिळणारे आर्थिक लाभ.  

  •  अपघाती मृत्यू दोन लाख रुपये. 
  • अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयवनिकामी होणे दोन लाख रुपये. 
  • अपघातामुळे एक डोळा व एक अवयवनिकामी होणे दोन लाख रुपये .
  • एक डोळा निकामी होणे किंवा एक अवयव निकामी होणे एक लाख रुपये. 

अपघात विम्याचा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे 

  • तालुका कृषी अधिकारी याचे पत्र. 
  • दावा करण्याचा अर्ज. 
  • वारसाचे बँक खाते पुस्तकाचे झेरॉक्स. 
  • घोषणापत्र अ, घोषणापत्र ब (अर्जदाराच्या फोटो सहीत)
  • वयाचा दाखला (मतदान कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, जन्माचा दाखला, पासपोर्ट, शाळेचा दाखला) साक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत जोडावे.
  • 7/12, 6 क, 6 ड (फेरफार ) सर्व मूळ प्रत.  
  • मृत्यू प्रमाणपत्र (मूळ प्रत). 
  •  एफ.आय.आर (प्रथम माहिती अहवाल).  
  • अकस्मात मृत्यूची खबर.  
  • घटनास्थळ पंचनामा.  
  • मरणोत्तर पंचनामा.  
  • पोस्टमार्टम रिपोर्ट (शवविच्छेदन अहवाल). 
  •  वाहन चालविण्याचा वैद्य परवाना. 
  • व्हीसेरा रिपोर्ट. 

विमा संरक्षणासाठी समाविष्ट असलेले अपघात 

  • रेल्वे रस्ता अपघात. 
  • उंचावरून पडून मृत्यू.  
  • पाण्यात बुडून मृत्यू. 
  • विषबाधा.  
  • विजेचा धक्का.  
  • वीज पडून मृत्यू.  
  • सर्प दंश, विंचू दंश. 
  • खून ,नक्षलवाद्याकडून होणाऱ्या हत्या. 
  • जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारा अपघाती मृत्यू.
  • दंगल इत्यादीमुळे होणाऱ्या अपघाती घटना मुळे शेतकऱ्यास मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमा द्वारे आर्थिक लाभ मिळू शकतो

पुढील प्रकारे अपघात मृत्यू किंवा जखमी झाल्यास लाभ मिळणार नाही. 

  • नैसर्गिक मृत्यू 
  • योजना सुरू होण्यापूर्वी चे अपंगत्व. 
  • आत्महत्येचे प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे.  
  • गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचा उल्लंघन करताना झालेला अपघात.  
  • अमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात.  
  • भ्रमिष्टपणा. 
  • शरीरांतर्गत रक्तस्राव. 
  • मोटार शर्यतीत झालेला अपघात.  
  • युद्ध, सैन्यातील नोकरी. 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अर्ज कुठे व कसा करायचा 

  • शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यापासून 30 दिवसाच्या आत त्याबाबतचा प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी याच्याकडे जमा करायचा आहे. 
  • एका साध्या कागदावर अपघात विषयाची सविस्तर माहिती लिहून अर्ज करायचा आहे. 
  • यात स्वतःबद्दलची माहिती लिहून मग मयतव्यक्ती चे नाव त्याच्यासोबतच नातं, मृत व्यक्तीच्या मृत्यूचा कारण, तारीख इ लिहायची आहे. 
  • मृत्यू झाला की अपंगत्व आलं ते लिहायचं आहे.  
  • पुढे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना लाभ मिळावा असे लिहायचा आहे.
  • ही प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यास महसूल, पोलीस आणि कृषी अधिकाऱ्यांचे पथक प्रत्यक्षात घटनास्थळी भेट देऊन चौकशी करेल आणि आठ दिवसाच्या आत आपला अहवाल तहसीलदार यांच्याकडे देतील.
  • तहसीलदारसाहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती 30 दिवसाच्या आत शेतकरी कुटूंबाला मदत देण्याबाबत निर्णय देईल.

टीप:- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यात जिल्हा कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क करा व आपला दावा अर्ज आवश्यक कागदपत्रासह 30 दिवसाच्या आत मध्ये दाखल करा.

आणखी माहिती वाचा

Leave a comment