असे करा गोगलगायीचे नियंत्रण.

राज्यात मागील वर्षी खरीप हंगामात बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला व फळ पिकामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेले दिसून आला. सोयाबीन कापूस या पिकामध्ये रोपअवस्थेत गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वैशिष्ट्ये

  • ही कीड निषाचर असल्याने रात्रीच्या वेळी पानासहित पूर्ण रोप खाऊन टाकते.
  • एकावेळी100 ते 150 अंडी प्रती गोगलगाय देते.
  • ही कीड उभयलिंगी आहे.
  • ही कीड आठ महिन्यापर्यंत सुप्त अवस्थेत जातात. थंड जमिनीत, सावलीत किंवा झुडुपाच्या बुंध्याशी राहतात.

सक्रिय काळ

-जून ते सप्टेंबर (पावसाळी वातावरण) या काळात त्यांना अनुकूल असे वातावरण तयार होते.


गोगलगायीस अनुकूल परिस्थिती अनुकूल वातावरण


सतत ओलावा, ढगाळ वातावरण, कमी प्रकाश, सतत पाऊस, जास्त आद्रता, कमी तापमान (20 ते 32°) व सकाळी भरपूर प्रमाणात दव पडणे.


गोगलगाईचे नियंत्रण. (Snail Control)

  • गोगलगायचे नियंत्रण हे सामूहिक मोहीम राबवून करणे आवश्यक आहे.
  • उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. ज्यामुळे जमिनीच्या खालच्या थरात लपलेल्या गोगलगायी जमिनीच्या वरच्या थरात येतील आणि सूर्याच्या उष्णतेमुळे नष्ट होतील.
  • शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत त्यामुळे गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यास जागा मिळणार नाही.
  • पेरणीनंतर पूर्ण शेताभोवती बांधाच्या आतल्या बाजूने 5 इंच रुंदीचा चुन्याच्या किंवा तंबाखू च्या पट्ट्या ओढाव्यात.
  • शेताच्या कडेने 1 ते 2 फुटाचे चर काढावे.
  • प्रादुर्भावग्रस्त शेतात तुषार सिंचन एवेजी ठिबक सिंचन चा वापर करावा, कारण ठिबक सिंचन केल्याने शेतातील आद्रतेचे प्रमाण कमी होईल व गोगलगायीस अनुकूल वातावरण मिळणार नाही.
  • मेटाल्डीहाईड 2.5% (snailkill) या औषधाच्या पेलेटसला (गोळ्या) कट करून बारीक गोळ्यात रूपांतर करावे. सोयाबीनच्या पेरणीनंतर लगेच शेताच्या बांधाच्या आतल्या बाजूने 5 ते 7 फूट अंतरावर या औषधाची एक गोळी टाकावी तसेच बांधाव्यतिरिक्त शेतात पण गोगलगायीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास चार ओळीनंतर बाजूने पाच फूट अंतरावर या औषधाच्या गोळ्या टाकाव्यात. स्नेलकील हे औषध गोगलगायना आकर्षून घेते. या गोळीला चाटल्यानंतर चार ते पाच तासांनी गोगलगायच्या आतील स्राव बाहेर येऊन गोगलगायीचे नियंत्रण होते.
  • रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग किंवा सुतळीचा बारदाना दहा लिटर पाण्यात एक किलो गूळ टाकून भिजवावी व प्रती एकरी चार ते पाच ठिकाणी ठेवावे सकाळी या ढिगा खाली किंवा बारदानाखाली जमा झालेले किडी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावेत.
  • लहान गोगलगाईच्या नियंत्रणासाठी 20% (10 लीटर पाण्यात 2 किलो मीठ) मीठाच्या द्रावणाची फवारणी करावी
  • गोगलगायीच्या नियंत्रणा साठी विषारीअमिषाचा वापर करता येतो, त्यासाठी गहू किंवा भाताचा कोंडा 50 किलो त्यामध्ये 25 ग्राम यीस्ट गुळाच्या द्रावणात(200 ग्राम गूळ प्रती 10 ली पाणी) 12-15 तास भिजत ठेवावे त्यामध्ये मिथोमिल 40 एस. पी. या कीटकनाशकाची 50 ग्रॅम भुकटी मिसळावी. हे तयार केलेले आमिष संध्याकाळच्या वेळेस प्रादुर्भावित शेतात पसरावे. विषारी आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी हातामध्ये रबरी मोजे घालून गोळा करावेत व एक मीटर खोल खड्ड्यात पुरून टाकाव्यात. (मिथोमिल हे अत्यंत विषारी कीटकनाशक असल्याने हे आमीष खाऊन मेलेल्या गोगलगाई पाळीव प्राणी भटके प्राणी इतर पक्षी आणि लहान मुले यांच्यापासून दूर ठेवावे)

आणखी वाचा

  1. महाबीजची दर्जेदार जैविक उत्पादने बाजारात दाखल.
  2. माती परीक्षण कसे करावे.
  3. महाबीज च्या बीज्योत्पादन कार्यक्रमातून मिळवा 30 ते 35 % ते नफा.

7 thoughts on “असे करा गोगलगायीचे नियंत्रण.”

  1. खुप छान माहिती आहे माझे गत वर्षी सोयाबीन पिकाचे खुप नुकसान झाले

    Reply
  2. Pingback: www.pikpani.com

Leave a comment