KDS-726 फुले संगम चे पीक व्यवस्थापन

KDS-726 (Fule sangam) management. KDS-726 Information. KDS-726 पिक व्यवस्थापन. डॉ मिलिंद देशमुख यांचे KDS-726 बदल चे मार्गदर्शन.

सद्य स्थिती

राज्यभरात सध्या खरिपाच्या पेरण्या संपत आल्या आहेत. राज्यात सोयाबीन, तूर, उडीद, कापूस आणि ऊस हे प्रमुख पिके घेतली जातात. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकाचा पेरा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोयाबीन हे कमी कालावधीचे नगदी पीक आहे. महाराष्ट्रात तसेच देश्यामधे सोयाबीन पिकाच्या  उत्पादनाने शेतकरी बांधवांमध्ये सुबत्ता आली आहे. शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकांमधून चांगला पैसा मिळत असल्याने शेतकरी सोयाबीन पिकांमध्ये विविध प्रयोग करत आहेत. तसेच सोयाबीनच्या नवीन वाणाची मागणी करत आहेत.

                 मागच्या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत सोयाबीन संशोधन केंद्र कसबे दिग्रस येथे संशोधित केलेल्या KDS-726 म्हणजेच फुले संगम या वानाची प्रचंड मागणी होती. या वाणाची शेतकरी बांधवांमध्ये मागणी जास्त असल्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्या, कृषी विद्यापीठे, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी KDS-726 म्हणजेच फुले संगम या वाणाचे बियाणे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिले आहे. सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात KDS-726 च्या बियाण्याची पेरणी झाली आहे किंवा चालू आहे, परंतु पावसाला उशीर झाला असल्याने व KDS-726 हे दीर्घ कालावधीचे वान असल्याने शेतकरी संभ्रम अवस्थेत आहेत.  त्याबद्दल सविस्तर आढावा खालील प्रमाणे घेण्यात येत आहे. 

KDS-726 या वाणाची माहिती

 संशोधन करणारी संस्था:- सोयाबीन संशोधन केंद्र कसबे दिग्रस, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. 

 प्रसारित वर्ष:- 2019

 पिक कालावधी:-  100 ते 105 दिवस ( जवळपास 3 महीने 15 दिवस )

 उत्पन्न:- 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर (सरासरी 10 क्विंटल प्रती एकर)

 उंची:- मध्यम स्वरूपाची 

दाण्याचे वजन व आकार:-  दाण्याचा रंग आकर्षक पिवळसर दाण्याची साईज मोठी आहे. 

फुलाचा रंग:- जांभळा 

पेरणीसाठीचे अंतर:- दोन ओळीतील अंतर 1.5 फूट व  दोन झाडातील अंतर 2 ते 3 इंच

शिफारस:- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व मध्य प्रदेश इत्यादी.

KDS-726 या वाणाचे व्यवस्थापन 

पेरणी

 •  KDS-726 (फुले संगम) या वाणाच्या झाडांची उंची व आकार सर्वसाधारण वाणांपेक्षा थोडा जास्त उंच व थोडा जास्त डेरेदार आहे. त्यामुळे शक्यतो फुले संगम हे वांन पेरणी करण्यापेक्षा लागवड करणे फायद्याचे ठरते. 
 • लागवड करताना दोन ओळी मधील अंतर कमीत कमी 1.5 फूट ठेवावे व दोन झाडातील अंतर 2 ते 3 इंच ठेवावे.
 • पेरणी करायचीच असेल तर बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी. 
 • पेरणीस उशीर जरी झाला असला तरी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सोयाबीन संशोधक श्री मिलिंद देशमुख यांनी 15 ते 20 जुलै पर्यंत फुले संगम या वाणाची योग्य नियोजन करून पेरणी करण्यास हरकत नसल्याचे सांगितलेआहे. 

तण व्यवस्थापन

 • पेरणीनंतर लगेच व तण उगवण्याच्या अगोदर स्ट्रॉंगआर्म सारखे तणनाशक वापरता येते किंवा पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी शाखेद किंवा मस्तानासारखे तन नाशक वापरता येते.
 • पहिल्या 30 ते 40 दिवसात पूर्णतः नियंत्रण करणे आवश्यक आहे 40 दिवसानंतर झाडांची उंची वाढल्यानंतर तन नियंत्रण करणे शक्य होत नाही.

पाणी व्यवस्थापन

 • सोयाबीन मध्ये फुलोरा व दाणे भरणे या अवस्था पाण्यासाठी संवेदनशील आहेत, या अवस्थेत पिकाला पाणी मिळाले नाही तर उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
 • फुलोरा व दाणे भरणे या कालावधीत जरी शेतातील ओल कमी असेल किंवा पाऊस कमी असेल तर पाटाने पाणी देणे किंवा स्प्रिंकलरने पाणी द्यावे.

बुरशी व कीड व्यवस्थापन

 • उशिरा झालेल्या पेरणीमुळे किंवा नंतरच्या कालावधीत पावसाचे प्रमाण वाढल्यास पिकावर येलोवेन मोजायक हा रोग येण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चांगल्या कंपनीच्या बुरशीनाशकाचे फवारणी करावी.
 • उदरणार्थ- M-45, Bavistin, carbendazim, thiuram, रिजल्ट, शमीर. इत्यादि.

काढणी

 • शेंगा पूर्ण पक्व झाल्यानंतर सोयाबीन ची पूर्ण पानगळ झाल्यानंतर काढणी करावी.
 • काढणीनंतर दोन ते तीन दिवस सोयाबीनमधील आद्रता कमी होण्यासाठी उन्हात वाळत ठेवावे.
 • सोयाबीन काढण्याच्या वेळेस जर ढगाळ वातावरण असेल किंवा पाऊस असेल तर एका उत्तम अशा बुरशीनाशकाची फवारणी करावी जेणेकरून आपली सोयाबीन काळे पडणार नाही

KDS-726 लागवडीचे फायदे.

 • हे वाण खोडमाशी किडिस मध्यम प्रतिकारक्षम आहे.
 • हे वाण तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे.
 • या वाणामध्ये तेलाचे प्रमाण 18.42 % आहे.
 • मुळकुज व खोडकुज रोगास प्रतिकक्षम आहे.
 • एकरी 10-12 क्विंटल उत्पादन क्षमता.

KDS-726 संदर्भात डॉ. मिलिंद देशमुख यांचे मार्गदर्शन.

अधिक माहिती वाचा.

 1. शेतकऱ्यांना उद्योगासाठी मिळणार 10 लाख रु अनुदान. (PMFME scheme)
 2. एक रुपयात पिक विमा.
 3. असे करा गोगलगायीचे नियंत्रण.
 4. महाबीज च्या बीज्योत्पादन कार्यक्रमातून मिळवा 30 ते 35 % ते नफा

2 thoughts on “KDS-726 फुले संगम चे पीक व्यवस्थापन”

Leave a comment