महाबीज च्या बीज्योत्पादन कार्यक्रमातून मिळवा 30 ते 35 % ते नफा

महाबीज

महाबीज म्हणजेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ही एक शासन अंगीकृत बियाणे क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. महाबीज वर्षभरात विविध पिकांचा राज्यभर बीज्योत्पादन कार्यक्रम राबवत असते. यामध्ये राज्यातील प्रमुख पिके जसे सोयाबीन, तूर, उडीद, मूग धान, कापूस या बरोबरच काही भाजीपाला पिके जसे कांदा, मिरची, टोमॅटो इत्यादीचा बीज्योत्पादन कार्यक्रम राबावत असते. बीज्योत्पादन कार्यक्रमा मधुन उत्पादित झालेले बियाणे महाबीज प्रक्रिया करून सर्वसामान्य शेतकऱ्याना विक्रेत्या मार्फत उपलब्ध करून देते.

बिज्योत्पादण कार्यक्रम घेण्याचे फायदे

महाबीज मार्फत शेतकऱ्याना मूलभूत/पायाभूत (फाऊंडेशन/ब्रिडर) बियाणे दिले जाते. ते बियाणे शेतकऱ्यांच्या शेतावर पेरून बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी व महाबीज चे अधिकारी यांच्या निरीक्षणा खाली उच्च प्रतीचे पायाभूत/ प्रमाणित बियाणे तयार केले जाते. शेतकऱ्याकडे तयार झालेले बियाणे महाबीज शेतकऱ्याकडून घेते. शेतकऱ्याकडून कच्चे बियाणे प्राप्त झाल्यानंतर लगेच त्या पिकाच्या बाजारभवाच्या 80 % रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. बियाण्याच्या विविध तपासण्या झाल्या नंतर अंतिम पात्र बियाण्याला महाबीज मार्फत बाजारातील उच्यतम भावाच्या दोन महिन्याच्या सरासरी पेक्षा पायाभूत बियाण्याला 35% तर प्रमाणित बियाण्याला 25% अधिकचा दर दिला जातो.

या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या बियाण्याची उगवण क्षमता 80% च्या वर असेल तर प्रती क्विंटल 100 रु पर्यन्त बोनस व लोग्रेड (काडी, कचरा, माती) चे प्रमाण कमी असेल तर 100 रु प्रती क्विंटल पर्यन्त बोनस दिला जातो. एकंदरीत शेतकऱ्यांना 30 ते 40 % पर्यन्त नफा महाबीज च्या बीज्योत्पादन कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मिळवता येऊ शकतो.

हमीभावाची हमी

महाबीज मार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व पिकाच्या बिजयोत्पादण कार्यक्रमाअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या बियाण्याला कमीत कमी शासना मार्फत जाहीर होणारा हमीभाव देण्यात येतो. त्यामुळे शेतकरी बांधवाना महाबीज मार्फत हमीभावाची हमी देण्यात येते व बाजारातील चढ उतरा मध्ये शेतकरी बांधवांचे नुकसानी पासून स्वंरक्षण होते.

बीज्योत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी संपर्क कोठे करावा.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, मर्या चे मुख्य कार्यालय अकोला येथे आहे तर महाबीज चे जिल्हा स्तरावर जिल्हा कार्यालये आहेत. सर्व जिल्ह्यात जिल्हा व्यवस्थापक कृषि क्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्फत बीज्योत्पादन कार्यक्रम राबावतात. आपल्या जिल्ह्यातील बीज्योत्पादन कार्यक्रमाच्या माहिती करिता व बीज्योत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी खालील तक्त्या मधील जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करावा.

महाबीज च्या बीज्योत्पादन कार्यक्रमातून मिळवा 30 ते 35 % ते नफा
क्रजिल्ह्याचे नावसंपर्क क्रमांक
1 अकोला8669642764
2 अमरावती8669642758
3 बुलढाणा8669642783
4वाशिम8669642762
5यवतमाळ8669642750
6जळगाव8669642722
7नाशिक8669642710
8धुळे8669642726
9जालना8669642713
10संभाजी नगर8669642716
11अहमदनगर8669642730
12बीड8669642718
13पुणे 8669642774
14सातारा 8669642740
15सांगली 8669642766
16कोल्हापूर 8669642743
17नागपुर8669642785
18वर्धा8669642784
19चंद्रपूर 8669642757
20भंडारा8669642721
21परभणी8669642779
22लातूर 8669642739
23नांदेड 8669642727
24धाराशीव8669642734
25हिंगोली8669642735
26सोलापूर8669642791

अधिक माहिती वाचा

  1. असे करा गोगलगायीचे नियंत्रण.
  2. महाबीजची दर्जेदार जैविक उत्पादने बाजारात दाखल.
  3. माती परीक्षण कसे करावे
  4. एक रुपयात पिक विमा.

14 thoughts on “महाबीज च्या बीज्योत्पादन कार्यक्रमातून मिळवा 30 ते 35 % ते नफा”

  1. आपला प्रोग्राम उत्तम आहे मी वीस वर्षापासून प्रोग्राम घेतो आणि त्याचा लाभ ही मला मिळाला महामंडळ शेतकऱ्याचे हिताचं काम करते असं दिसून आलं मला सभासद व्हायची आहे सभासद करून घेणे ही विनंती आपला शेतकरी विजयकुमार रामराव शिंदे मोबाईल नंबर 95 52 77 0377

    Reply

Leave a comment