तणनाशक फवारणी करताना काय काळजी घ्यावी.

तणनाशकाची आवश्यकता, काळजी काय घ्यावी. तणनाशकाची निवड. weedicides effects and precautions. तणनाशकाचे फायदे.

तणनाशकाची आवश्यकता.

  • सध्या स्पर्धेच्या युगात शेतकामासाठी मजूर मिळणे खूप अवघड आहे.
  • शेतकऱ्यांचा ओढा हा तणनाशक फवारणीकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
  • तणनाशक फवारणी मुळे स्वस्तात व कमी कालावधीमध्ये तणनियंत्रण होत असल्याने शेतकऱ्यांसाठी तणनाशक फवारणी करणे फायद्याचे ठरत आहे.

तणनाशक फवारणी करताना घ्यायची काळजी.

  • तणनाशक फवारणी साठी एक स्वतंत्र स्प्रे पंप (फवारा)ठेवावा तो स्प्रे पंप इतर कीटकनाशके व बुरशीनाशके फवारणीसाठी वापरू नये.
  • तन नाशक फवारणी करण्यापूर्वी स्प्रे स्वच्छ पाण्याने धुवा त्यानंतर माती मिश्रीत पाण्याने धूवून पाण्याने परत स्वच्छ पाण्याने साफ करणे.
  • माती मिश्रित पाण्याने स्प्रे पंप साफ केल्याने त्यामध्ये पूर्वीच्या तणनाशकाचे असलेले अंश निष्क्रिय होतात.
  • त्यामुळे माती मिश्रित पाण्याने स्प्रे पंप साफ करणे महत्त्वाचे आहे.
  • माती मिश्रित पाण्याने स्प्रे पंप धुतल्यानंतर लगेच स्वच्छ पाण्याने स्प्रे पंप धुणे कारण माती मिश्रित पाणी स्प्रे पंप मध्ये राहिल्यास फवारणी करण्यात येणारे तणनाशक काम करणार नाही.
  • तणनाशकाची निवड करताना पीकनिहाय तणनाशकाची निवड करावी.
  • एका पिकासाठी असलेले तन तणनाशक दुसऱ्या पिकासाठी वापरू नये.
  • 2.4.D सारखे तणनाशक जे ज्वारी, गहू, मक्का, ऊस, यामध्ये चालते त्या तणनाशकाची फवारणी करत असताना शेजारील शेतामध्ये असलेल्या पिकावर ते जाणार नाही याची काळजी घ्यावी किंवा शेजारच्या पिकांच्या जवळील दोन-तीन ओळी सोडून फवारणी करावी.
  • तन नाशकाची फवारणी ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत हवा शांत असल्यास करावी.
  • हवेचा वेग जास्त असल्यास तणनाशक शेजारच्या शेतात जाऊन दुसऱ्या पिकांचे नुकसान होऊ शकते.
  • जेवढे सांगितले आहे त्याच प्रमाणात तणनाशक वापरावे जास्त किंवा कमी वापरू नये.
  • तणनाशकाचे प्रमाण जास्त वापरल्यास पिकांवर परिणाम होऊ शकतो व कमी वापरल्यास औषधांचा परिणाम तणावर होणार नाही.
  • तणनाशक वापरताना जमीन ओली असणे आवश्यक आहे, कारण जेव्हा तण वाढीच्या अवस्थेत असते तेव्हा तणनाशक उत्तम काम करते.
  • तणनाशकाच्या स्प्रे पंप मध्ये 200 ते 300 ग्राम युरिया टाकल्यास अधिक प्रभावीपणे काम करते.

तणनाशक फवारणी चे फायदे.

  • कमी कालावधीत व कमी खर्चात तन नियंत्रण करता येते
  • रासायनिक तणनियत्राणामध्ये मजूर कमी लागतात यामुळे खर्चात बचत होत

पिक निहाय तणनाशके.

अ. क्र पिकाचे नाव तणनाशकाचे नाव
1 गहू, ज्वारी, मका, उस 2.4. D
2उस आयमॅक्स, टाटा मेट्रि.
3 सोयाबीन शाकेद, मस्तना, वीड ब्लॉक.
4 कांदागोल
5सर्व प्रकारचे तण (कोणत्याही पिकावर न चालणारे)राऊंड उप, मेरा 71

अधिक माहिती वाचा

  1. KDS-726 फुले संगम चे पीक व्यवस्थापन
  2. E-KYC करा आणि PM KISAN ची शेतकरी पेनशन मिळवा.
  3. शेतकऱ्यांना उद्योगासाठी मिळणार 10 लाख रु अनुदान. (PMFME scheme)
  4. एक रुपयात पिक विमा.

Leave a comment