सामाविष्ठ माहिती
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME scheme)
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही केंद्र शासनामार्फत राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा करता यावा यासाठी केंद्र शासनामार्फत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ३५% किंवा दहा लाखापर्यंत अनुदान दिले जाते.
योजनेत समाविष्ट जिल्हे.
- महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हे या योजनेत समाविष्ट आहे.
- या योजनेचा लाभ दोन लाख उद्योगांना मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत वैयक्तिक, एफ पी ओ, बचत गट, सहकारी संस्था यांना लाभ मिळणार आहे.
योजनेचा उद्देश.
- सध्या अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविणे व त्यांना प्रोत्साहन देणे.
- नवे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पाठबळ पुरवणे.
- सर्व प्रकारच्या नवीन कार्यरत व आजारी अन्नप्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित लाभ देणे.
- पारंपारिक किंवा स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे.
- नाशवंत व मागणी अभावी वाया जाणाऱ्या कच्चामालाच्या प्रक्रियेला प्राधान्य देणे.
PMFME योजनेचा लाभ कोणाला मिळेल
- वैयक्तिक लाभ – उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था.
- गटला लाभ – शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गट, संस्था स्वयंसहायता गट, सहकारी किंवा शासकीय संस्था.
PMFME योजनेमध्ये कोणत्या व्यवसायांना लाभ मिळेल
- दुग्ध/पशु उत्पादने व प्रक्रिया उद्योग.
- सागरी उत्पादने, मास उत्पादने प्रक्रिया उद्योग.
- वन उत्पादने व प्रक्रिया उद्योग.
- फळपिके प्रक्रिया उद्योग.
- भाजीपाला प्रक्रिया उद्योग.
- अन्नधान्य, तृणधान्य, कडधान्य, मसाला पिके इत्यादी वर आधारित प्रक्रिया उद्योग.
वैयक्तिक लाभासाठी पात्रता निकष.
- वय अठरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- शिक्षणाची कोणतीही अट नाही.
- नवीन तसेच कार्यरत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना लाभ मिळणार.
- नवीन प्रक्रिया उद्योग व कार्यरत उद्योगाचे विस्तारीकरण व विस्तर वृद्धीकरण घटकासाठी लाभ मिळणार.
- लाभार्थ्यांनी किमान दहा टक्के गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
वैयक्तिक लाभासाठी आवश्यक कागदपत्रे.
अ :- PMFME योजनेमध्ये नवीन सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी.
- सबंधिताचे पॅन कार्ड, प्रवर्तक किंवा फॉर्म 60.
- सर्वप्रवर्तक व जामीनदाराची आधार कार्ड प्रत आणि फोटो.
- पत्त्याचा पुरावा (अधिकृत वैद्यस्तऐवजी पैकी कोणताही) युनिट बिल (कोणतेही सेवा प्रगतीचे दोन महिन्यापेक्षा जास्त जुने नाही), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड.
- उद्यम नोंदणी प्रमाणपत्र.
- ज्या ठिकाणी युनिट स्थापन करायचे आहे त्याचा तपशील मालकीचे किंवा भाड्याचे/ भाड्याने दिलेली आहे का? आणि त्याचा पुरावा.
- मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट/बँक पासबुकची प्रत.
- सर्व भांडवली खर्चाचे अंदाजपत्र आणि खरेदी करण्याचे यंत्रसामग्री उपकरणाचे कोटेशन.
ब:- PMFME योजनेमध्ये कार्यरत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी कागदपत्रे
- संबंधिताचे किंवा गटाचे सर्व, प्रवर्तक जामीनदाराचे पॅन कार्ड.
- सर्वप्रवर्तक जमीनदाराचे आधार कार्ड आणि फोटो. पत्त्याचा पुरावा (अधिकृत वैद्य दस्तऐवज) युनिट बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, कर भरलेली पावती, रेशन कार्ड.
- उद्योग नोंदणी प्रमाणपत्र, एस आय कार्ड, जिथे लागू असेल तिथे परवाना, व्यापार परवाना, दुकान आणि आस्थापना नोंदणी, पंचायत परवाना, महानगरपालिका परवाना, व्यवसाय भागीदारी करार.
- जर वैयक्तिक किंवा मालक म्हणून असेल फर्मच्या शेवटच्या सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुक.
- जेथे युनिट स्थापन केले आहे त्या जागेचा तपशील, मालकीचे किंवा भाड्याने दिलेले आहे का? आणि त्याचा पुरावा.
- सर्व भांडवली खर्चाचे अंदाजपत्रक आणि खरेदी कराव्याच्या यंत्रसामग्री व उपकरणे यांचे कोटेशन.
- विद्यमान युनिटचा फोटो.
- एक वर्षाचे लेखापरीक्षण ताळेबंद.
- उद्योगांनुसार परवण्याची प्रत.
- जीएसटी नोंदणीचे प्रमाणपत्र.
- मागील आर्थिक वर्षाचे जीएसटी रिटर्न्स.
- विद्यमान यंत्रसामग्री आणि उपकरणांची यादी इ.
गट, संस्था किंवा कंपनी यांना लागणारी कागदपत्रे.
भागीदारी शेतकरी उत्पादक संस्था, स्वयं सहाय्यता गट, गैरसरकारी संस्था, सहकारी संस्था, खाजगी कंपनी इत्यादींना या योजनेचा लाभ मिळणार.
अ :- PMFME योजनेमध्ये नवीन प्रक्रिया उद्योगासाठी लागणरी कागदपत्रे.
- कंपनी/गटातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड.
- कंपनी/गटातील सर्व सदस्यांची फोटोसह यादी, संपर्क क्रमांक, अणि वैयक्तिक सदस्यांचा पत्ता.
- पत्याचा पुरावा- लाइट बिल, फोन बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र,
- उद्यम नोंदणी प्रमाणपत्र.
- सहकारी संस्थांचे नोंदणी प्रमानपत्र.
- मंडळाच्या कार्यकारी सदस्यांची यादी
- अधिकृत स्वाक्षरीकरत्याद्वारे प्रमाणित केलेला बयोडेटा.
- उद्योगानुसार परवानगी प्रमनपत्र.
- सर्व भांडवली खर्चाचे कोटेशन आणि खरेदी करावयाच्या यंत्रसमुग्री व उपकरणांची यादी.
ब:- PMFME योजनेमध्ये कार्यरत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी कागदपत्रे
- कंपनी/गटातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड.
- कंपनी/गटातील सर्व सदस्यांची फोटोसह यादी, संपर्क क्रमांक, अणि वैयक्तिक सदस्यांचा पत्ता.
- पत्याचा पुरावा- लाइट बिल, फोन बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र,
- उद्यम नोंदणी प्रमाणपत्र.
- सहकारी संस्थांचे नोंदणी प्रमानपत्र.
- मंडळाच्या कार्यकारी सदस्यांची यादी
- अधिकृत स्वाक्षरीकरत्याद्वारे प्रमाणित केलेला बयोडेटा.
- बँकेसाठी पॉवर ऑफ एटर्नी असेल टर त्याचे प्रमनपत्र.
- उद्योगानुसार परवानगी प्रमनपत्र.
- सर्व भांडवली खर्चाचे कोटेशन आणि खरेदी करावयाच्या यंत्रसमुग्री व उपकरणांची यादी.
- मागील 3 वर्षाचे ताळेबंद.
- मागील 3 वर्षांचे ITR रिटर्न्स.
- GST नोंदणी प्रमाणपत्र.
- मागील 3 वर्षांचे GST रिटर्न्स.
- ज्या ठिकाणी यूनिट स्थापन केले आहे त्या जागेचा तपशील, मालकीची/ भाड्याने घेतलेली आहे का त्याचा पुरावा.
PMFME योजनेची संपूर्ण प्रक्रिया
या योजने मधून लाभ घेण्यासाठी जे अर्जदार असतील त्यांना करावी लागणारी सर्व प्रक्रिया ही सोबत जोडलेल्या फोटो मध्ये व्यवस्थित दर्शविलेली आहे. अर्ज करण्यापासून ते अनुदान मिळे पर्यंतचा सगळा प्रवास सदरील फोटो मध्ये दाखवला आहे. तरी अधिक माहिती साठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा तसेच अधिक माहितीसाठी आपण केंद्र सरकारच्या PMFME च्या वेबसाइट ची मदत घेऊ शकता. PMFME च्या वेबसाइट ला भेट देण्यासाठी क्लिक करा .

4 thoughts on “शेतकऱ्यांना उद्योगासाठी मिळणार 10 लाख रु अनुदान. (PMFME scheme)”