कृषि जाहिरात

शेतकरी.

  • महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग व व्यापारी वर्ग यांच्यामध्ये एक दुवा निर्माण करण्याचा प्रयत्न हा पिक पाणी मार्फत केला जात आहे. यासाठी शेतकरी आपल्या उत्पादनाची मोफत जाहिरात या पिक पाणी च्या वेबसाइट वर करू शकतात, यातून शेतकरी बांधवांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल.

व्यापारी.

  • महाराष्ट्र हे एक देशातील ओद्योगीक व कृषि क्षेत्रात प्रगतशील असे राज्य आहे. महाराष्ट्रातून विवीध कृषि उत्पादनाचा पुरवठा हा इतर राज्यात होत असतो, तसेच महाराष्ट्रातून इतर देशात खूप मोठया प्रमाणात कृषि उत्पादनाची निर्यात होत असते. त्यासाठी महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग हा कृषि उत्पादनाच्या शोधात असतो त्यांच्यासाठी पिक पाणी एक महत्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे व्यापारी बांधव त्यांना आवश्यक असलेल्या उत्पादनाची मागणी पिक पाणीच्या वेबसाईटवर मोफत नोंदवू शकतात.

कृषि विक्रेते.

  • कृषि क्षेत्रातील महत्वाचा घटक म्हणजे कृषि विक्रेते. कृषि विक्रेते अणि शेतकरी हे नात अतिशय जूनं अणि घट्ट आहे, पण बदलत्या काळात कृषि क्षेत्रा मध्ये मोठे बदल होत आहेत. त्यामध्ये कृषि विक्रेते यांच कार्यक्षेत्र विस्तारत आहे तर शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कृषि क्षेत्रात नवीन प्रयोग करत आहेत. अश्या प्रगतशील शेतकारी बांधवापर्यन्त कृषि विक्रेत्याना सहज पोहचता यावे म्हणून कृषि विक्रेते पिक पाणी च्या वेबसाइट वर मोफत जाहिरात करू शकतात.

आपली जाहिरात करण्यासाठी खालील व्हाटसप क्रमांकावर आपली सविस्तर माहिती, जाहिरात, मागणी, आपल्या संपूर्ण पत्यासह, फोटोसह व संपर्क क्रमांकासहित पाठवावी. आपली जाहिरात, मागणी प्रकाशित केल्यानंतर त्याची लिंक आपल्याला व्हाटसवर पाठवण्यात येईल.

जाहिराती साठी Whats App क्रमांक:- 9511817099

E-Mail ID :- pikpaani@gmail.com